चंद्रपूर: चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा खासदार प्रतिभा दानोरकर यांना शनिवारी 27 जुलै 2024 रोजी काँग्रेसचे श्रीनिवास गुडला यांनी निवेदन दिले. आणि काजीपेट-अजनी पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, जेणेकरून प्रवाशांना प्रवासात सोय होईल, असे सांगितले.
ही ट्रेन 25 वर्षांहून अधिक काळापासून धावत आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करणे अतिशय सोयीचे वाटले. कोरोना महामारीच्या काळात ही ट्रेन गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता कोरोना विषाणू कमी झाल्यामुळे, काजीपेट ते अजनी आणि अजनी ते काजीपेट प्रवासी सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात.




