Sunday, May 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

19 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षित, नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र आणि राणी हिराई शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपुर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावाचे आयोजन राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपुर येथे करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवी इत्यादी युवक व युवर्तीकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात 60 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या कमीत कमी दोन प्रतींसह राणी हिराई शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपुर येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर रोजगार मेळावा भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News