घुग्घुस, चंद्रपुर : येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम साध्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी भाजपाचे नगरसेवक विवेक बोढे यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. उपस्थित कार्यकर्त्यांनीही पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
मनोगत व्यक्त करताना नगरसेवक विवेक बोढे म्हणाले की, संत गाडगेबाबांनी समाजातील अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि विषमतेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले व स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. हातात झाडू घेऊन गावोगावी फिरत स्वच्छता अभियान राबविणारे ते एक महान समाजसुधारक होते. “स्वच्छता हीच सेवा, मानव सेवा हीच ईश्वर सेवा” हा त्यांचा विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमास भाजपाचे बबलू सातपुते, अजय लेंडे, गणेश राजूरकर, निखील अत्राम, सतीश निब्रड, आकाश वेलादी, प्रणय काटवले, भास्कर राजूरकर, निशा राजूरकर, हनुमान खडसे, जाई अत्राम, खुशबू मेश्राम, भारती परते, प्रिया नागभीडकर, मयुरी धुर्वे आदी उपस्थित होते.




