Wednesday, May 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

इतर मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी १३ उपमहामंडळांमार्फत विविध योजना; चंद्रपूर येथे जिल्हा कार्यालय सुरू

चंद्रपूर : इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत १३ उपमहामंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळांमार्फत विविध समाजघटकांच्या आर्थिक, शैक्षणिक व उद्योजक विकासासाठी योजना राबविण्यात येत आहेत.

यामध्ये लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी समाज), स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज), श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज), संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज), सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज), संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज), आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत समाज), संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज) तसेच संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (नाभिक समाज) यांचा समावेश आहे. या महामंडळांचे जिल्हा स्तरावरील कामकाज चंद्रपूर येथे सुरू करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत लाभार्थ्यांसाठी एकूण सहा योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आदी योजना पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.

याशिवाय २० टक्के बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजना (रु. १ लक्षापर्यंत) या ऑफलाईन स्वरूपाच्या असून, त्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 07172-262420 वर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के. के. सातपुते यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News