Wednesday, May 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय पोर्टल व हेल्पलाईन उपलब्ध

चंद्रपूर : तृतीयपंथीय समुदाय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून त्यांना आजही सामाजिक भेदभाव व उपेक्षेला सामोरे जावे लागते. या कारणामुळे हा समुदाय विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळावे तसेच त्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 व त्याअंतर्गत नियम 2020 संपूर्ण देशात लागू केले आहेत.

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविणे, त्यांची अधिकृत ओळख निश्चित करणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींना आवश्यक माहिती, सेवा तसेच सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसेच, तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आकस्मिक परिस्थितीत तातडीची मदत मिळावी व त्यांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी या राष्ट्रीय पोर्टलवर राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींनी त्यांच्या समस्या, तक्रारींच्या नोंदणीसाठी तसेच आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक 14427 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (समाज कल्याण) विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News