Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर महापालिका निवडणूक २०२६ : ५६.८९ टक्के मतदानाची नोंद

चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अंतर्गत १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या मतदानात शहरात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत शहरातील १७ प्रभागांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण २,९९,९९४ मतदारांपैकी १,७०,६६७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

प्रभागनिहाय मतदानाचा आढावा

सर्वाधिक मतदान :

प्रभाग १७ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) – ६३.४०%, प्रभाग १४ (भिवापूर) – ६२.४२%, प्रभाग १५ (विठ्ठल मंदिर) – ६१.८५%.

कमी मतदान :

प्रभाग ५ (विवेक नगर) – ४८.९५%

एकूण मतदानाची आकडेवारी

पुरुष मतदार : ८७,३०१ आणि महिला मतदार : ८३,३६३., इतर : ३, एकूण मतदान : १,७०,६६७

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आता सर्वांचे लक्ष मतमोजणी व निकालाकडे लागले असून, चंद्रपूर महापालिकेची पुढील राजकीय दिशा कोण ठरवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News