Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

प्रभाग चारमध्ये अपक्ष उमेदवार पुष्पा रामटेके यांचे पारडे जड

घुग्घूस, चंद्रपुर : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 4 (सर्वसाधारण ‘ब’ गट) मधून अपक्ष उमेदवार म्हणून पुष्पा रामटेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचे निवडणूक चिन्ह कंगवा आहे. यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविल्यामुळे त्या नागरिकांना परिचित असून त्यांचा मनमिळावू स्वभाव, सर्वांसोबत जुळून घेण्याची क्षमता आणि डोअर टू डोअर पद्धतीचा प्रचार यामुळे त्यांचे पारडे अधिक मजबूत होताना दिसत आहे.

शिक्षित, प्रामाणिक, तंत्रज्ञानाशी सुसंगत आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पुष्पा रामटेके या निवडून आल्यास गावापासून राज्यापर्यंत सकारात्मक परिवर्तन घडवू शकतील, असा विश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे. राजकारणात पक्ष किंवा पैसा नव्हे; तर ध्येय, दृष्टिकोन आणि धैर्य महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांच्या प्रचारातून दिसून येतो.

युवक, युवती आणि महिलांना त्या स्पष्टपणे सांगतात की ते केवळ भविष्य नाहीत, तर वर्तमानाचे परिवर्तनकर्ते आहेत. स्वच्छ विचार आणि स्वच्छ मनाने राजकारणात उतरलेली एक महिला पूर्ण समाजाची दिशा बदलू शकते, हा विश्वास त्या आपल्या कामातून दृढ करीत आहेत.

गावातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि संस्कार हेच खरी विकासाची मुळे असून याकडे लक्ष देणारी प्रत्येक महिला ही लोकशाहीची खरी रक्षक असल्याचे त्या सांगतात. राजकारण म्हणजे सत्तेसाठी संघर्ष नव्हे, तर समाजासाठी जबाबदारी स्वीकारणे असल्याचा संदेशही त्या देतात.

“राजकारण हे समाजसेवेचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आता युवक, युवती, महिला आणि पुरुष यांनी फक्त मतदान करण्यापेक्षा उमेदवारी दाखल करून नवा आदर्श घडवण्याची गरज आहे,” असे आवाहन त्या करतात. विकास, स्वच्छता आणि प्रामाणिकतेचा नवा अध्याय लिहायचा असेल, तर सहभाग आवश्यक असल्याचे त्या ठामपणे सांगतात.

महिलांच्या सहभागामुळे राजकारणाला नवी झळाळी मिळू शकते आणि त्यातून अधिक न्याय्य, सुंदर व सशक्त समाजाची निर्मिती होऊ शकते, असा ठाम विश्वास त्या व्यक्त करतात. आगामी घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 4 मधील नागरिकांचा पाठिंबा कोणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News