घुग्घुस, चंद्रपुर : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोलीचे दिवंगत संस्थापक प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या 76व्या जयंतीनिमित्त प्रियतर्शिनी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुसतर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लँकेट वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले.
प्राचार्य अनु चोथे यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नवी दिशा वृद्धाश्रम, घुग्घुस येथील निराधार वृद्धांना ब्लँकेट देण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, घुग्घुस येथे दाखल रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात प्राध्यापिका वैशाली जोशी, प्राध्यापक प्रकाश साताळे, श्री. बलवंत विखार, संजय माहुरे, उमादेवी लाटकरी यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




