Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अंतिम केलेली निवडणूक विभाग व निर्वाचक गण प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सुचना आमंत्रित

चंद्रपूर : जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक – 2025 करिता निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्याकरिता 56 निवडणूक विभाग (गट) व 112 पंचायत समिती निर्वाचक गण (गण) निहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. अंतिम केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर तसेच chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर प्रारूप मतदार यादीवर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना जिल्हाधिकारी / संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News