चंद्रपूर : एमआयडीसी परिसर ताडाळी येथे रोड कामासाठी ठेवलेले 06 मीटर लांबीचे एकूण 17 नग लोखंडी चॅनल चोरीस गेले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी चोरी गेलेला 1,86,000/- रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला ट्रक जप्त करून एकूण 16,86,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. चोरीच्या गंभीर घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून तात्काळ केलेल्या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.





