Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आई फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष अमोल नथ्थुजी मांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवला

घुग्घुस (चंद्रपुर) – आई फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अमोल नथ्थुजी मांढरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील मुख्य रस्त्यावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच समाजहिताच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात केवळ वृक्षारोपण न करता रस्त्यावर संचार करणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या गळ्यात रिफ्लेक्टर कॉलर देखील लावण्यात आले. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हे प्राणी दूरूनच दिसू शकतील आणि त्यांना अपघात टाळता येईल. तसेच, या प्राण्यांसाठी अन्नपाण्याचीही व्यवस्था करण्यात आली.

या उपक्रमात संस्थेचे पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष अमोल नथ्थुजी मांढरे, उपाध्यक्ष इरफान शेख, राजन धाबेकर, सदस्य तुषारजी बोबडे, सुभाषजी मांढरे, शंकर कामतवार, प्रशांत सारोकर, भुषण झुरमुरे, जिनेश्व दिघोरे, दिव्यांग बांधव गोपी ठाकरे, गणेश कामतवार, संदिप जुनारकर, चेतन कांबळे, कुणाल गावंडे, निखिल गुरूनुले, राकेश, सुजल हजारे आणि सचिन बावने यांचा सहभाग लाभला.

अध्यक्ष अमोल मांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला असून ग्रामस्थांनी याचे कौतुक केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News