Monday, April 20, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महाज्योती टॅब योजना 2025 : OBC, VJNT, SBC समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6GB डेटा

चंद्रपूर : विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय (OBC, VJNT, SBC) समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) अंतर्गत 2025 मध्ये सुरू करण्यात आलेल्या महाज्योती टॅब योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि 6GB डेटा दरमहा निःशुल्क पुरविण्यात येणार आहे.

ही योजना विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या व आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड, रहिवासी दाखला / डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, अकरावीची प्रवेश पावती, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, एक पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 जून 2025

इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी जवळच्या केंद्रात जाऊन किंवा घुग्घूस येथील अधिकृत केंद्राशी संपर्क साधून अर्ज सादर करावा.

ही योजना विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीने एक मोठी संधी ठरणार आहे. योग्य कागदपत्रांसह अर्ज वेळेत सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News