Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस शहरात आता चार वॉटर टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठ्याला सुरुवात

“पाणी हे प्रत्येक कुटुंबाची गरज; कुणीही वंचित राहू नये” – राजुरेड्डी

घुग्घुस (चंद्रपूर) – संपूर्ण देशात उष्णतेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहर सध्या तीव्र उन्हाच्या झळांनी होरपळून निघाले आहे. यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत काँग्रेसचे कार्यकर्ते राजुरेड्डी यांनी समाजकार्याची भूमिका बजावत, 19 मे 2025 पासून चार वॉटर टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठ्याला सुरुवात केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या रेड्डी यांनी यावर्षी पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे आणखी दोन टँकर वाढवले आहेत.

“पाणी ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज आहे. कोणताही नागरिक, विशेषतः महिला व वृद्ध, पाण्याअभावी त्रास सहन करू नये म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे,” असे मत राजुरेड्डी यांनी व्यक्त केले.

ज्यांना पाण्याची आवश्यकता आहे त्यांनी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात आपली नोंद करावी, त्यांना घरपोच पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

या नव्या टँकरचा विधिवत शुभारंभ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, तालुका सचिव विशाल मादर, अनिरुद्ध आवळे, शेख शमिउद्दीन, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, एससी तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, बालकिशन कुळसंगे, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, पदमा त्रिवेणी, दुर्गा पाटील, संध्या मंडल, सरस्वती कोवे, वैशाली पोपटकर, जोया शेख, दीपक पेंदोर, सुनील पाटील, कुमार रुद्रारप, देव भंडारी, शहंशाह शेख, आयुष आवळे, नाणी मादर, साहिल आवळे, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News