Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस येथे फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त स्पर्धा विजेत्यांचा सत्कार सोहळा संपन्न

घुग्घुस (चंद्रपुर) — बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त 12 एप्रिल 2025 रोजी आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांचा भव्य सत्कार समारंभ 14 एप्रिल 2025 रोजी पार पडला.

या मुख्य समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुस पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, आशिष मासिरकर स्मारक समितीचे अनिरुद्ध आवडे, प्रीती तामगाडे, नवबौद्ध स्मारक समितीचे अशोक रामटेके, गंगाधर गायकवाड, बबलू सातपुते, बौद्ध सर्कल समितीच्या दीप्ती सोनटक्के, उर्मिला लिहीतकर, सुरेखा बहादुरे, सविता मंडपे यांची उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे

रंगोली स्पर्धा: सरला भेले – प्रथम, चैताली सातपुते – द्वितीय

रस्सीखेच स्पर्धा: आम्रपाली महिला मंडळ – प्रथम

नींबू-चम्मच स्पर्धा (लहान मुली): मिठी रामटेके – प्रथम, नंदिनी चव्हाण – द्वितीय

नींबू-चम्मच (महिला): मनीषा वासेकर – प्रथम, उर्मिला लिहीतकर – द्वितीय

ग्रुप डान्स: शुभांगी भूमिका – प्रथम, श्रेया व फ्रेंच – द्वितीय

सोलो डान्स: श्रेयांश धोटे – प्रथम, नक्षत्रा तामगाडे – द्वितीय

संगीत खुर्ची (लहान मुली): हंसिनी पाझारे – प्रथम, सुद्वजा निमसरकर – द्वितीय

संगीत खुर्ची (महिला): स्मिता कांबळे – प्रथम, सुरेखा टिपले – द्वितीय

कराओके सॉंग स्पर्धा: नागेश पाईकराव – प्रथम, हंसिका कांबळे – द्वितीय

तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लहान मुला-मुलींनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगातील सर्व कलाकारांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात घुग्घुस पीएचसी अंतर्गत कार्यरत आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे यांनी एका गरजू स्त्री रुग्णाला वेळेवर मदत करून जीवनदान दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन भीमेंद्र कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाधर गायकवाड यांनी मानले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News