Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

स्थानीय गुन्हे शाखेची धडक कारवाई : देशी दारूसह १३.९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

वर्धा – दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री दरम्यान स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत १३,९३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी प्रशांत प्रदीप चांडाले (वय २३ वर्षे, रा. रामटेके लेआऊट, पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा) हा आपल्या ताब्यातील सिल्व्हर रंगाच्या हुंडाई क्रेटा (MH 40 AR 7244) कारमधून अमरावती जिल्ह्यातील विटाळा येथून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी दारू घेऊन पुलगावातील नाचणगाव चौफुलीमार्गे कवठा झोपडी येथे जात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील ऋषीराज ढाब्याजवळ नाकाबंदी लावण्यात आली. कारवाईदरम्यान प्रशांत चांडाले हा देशी दारूने भरलेल्या कारसह पकडला गेला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १८० मि.ली. क्षमतेच्या २४० सिलबंद देशी दारूच्या बाटल्या (किंमत ४८,०००/- रु.), हुंडाई क्रेटा कार (किंमत १२,००,०००/- रु.), ऍक्टिवा मोपेड (MH 32 AW 1216) (किंमत १,००,०००/- रु.), तसेच दोन अँड्रॉइड मोबाईल फोन (किंमत ४५,०००/- रु.) असा एकूण १३,९३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रशांत चांडाले याच्याकडे चौकशी केली असता, सदर दारू माल ‘बार’, विटाळा, जिल्हा अमरावती येथून आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या पथकात पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत आणि राहुल अधवाल यांचा समावेश होता.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News