Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नागपूरमध्ये ट्रकला भीषण आग; संपूर्ण घरगुती सामान जळून खाक

नागपूर – आज सकाळी ८ वाजता भंडारारोड नाका नंबर ५ जवळ घरगुती सामान शिफ्ट करणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले, ज्यामुळे ट्रकमध्ये असलेले संपूर्ण घरगुती सामान जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News