Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

डॉ. हुलगेश चलवादींच्या नेतृत्वाखाली बसपा आगामी निवडणुका लढवणार

BSP under the leadership of Dr. Hulgesh Calists will contest the upcoming elections

 

पुणे जिल्हा अध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची निवड

पुणे : बहुजन समाज पक्ष (बसपा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून, या निवडणुकीत प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मैदानात उतरणार आहे.

क्षाच्या अधिकृत घोषणेनुसार, पुणे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते अशोकराव गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत ३१ जिल्हा प्रभारी आणि १० जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांची माहिती डॉ. हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (दि. ७) दिली.

सपाचा नवा निर्धार

बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनिल डोंगर यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. नवीन कार्यकारिणी निवडीची जबाबदारी डॉ. हुलगेश चलवादी यांच्यावर सोपवण्यात आली होती. कार्यकारिणी जाहीर करताना त्यांनी महापुरुषांना अभिवादन केले आणि नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका डॉ. चलवादी यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना डॉ. चलवादी यांनी व्यक्त केली.

सपाचा ‘निळा झेंडा’ आणखी मजबूत करण्याचा निर्धार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अपेक्षित केलेल्या बहुजनवादी शासनकर्ती जमात घडवण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही डॉ. चलवादी यांनी सांगितले. समाजातील शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बसपाचा ‘निळा झेंडा’ आणि ‘हत्ती’ चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे.

वीन नेतृत्वाच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अशोकराव गायकवाड यांचे अभिनंदन करत नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आगामी निवडणुकीत बसपा पूर्ण ताकदीने उतरणार असून, संघटन बळकट करण्यासाठी नव्या कार्यकारिणीला प्रभावी रणनीती आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News