Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात ‘७५ वा संविधान दिन’ साजरा

घुग्घुस (चंद्रपुर) : २६ डिसेंबर २०२४, मंगळवार रोजी इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, घुग्घूस येथे ‘७५ वा भारतीय संविधान दिन’ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधुन राज्यघटनेच्या सरनाम्याचे समूहिक वाचन ठिक अकरा वाजता करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.शहनाज पठान यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदन केले. त्यांनी विद्यार्थिनिंना संबोधित करताना भारतीय संविधानाचे महत्वाचे वैशिष्ट्ये सांगुन प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आपल्या संविधाना बाबत काय भूमिका असायला पाहिजे याचे मार्गदर्शन करून राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांनी सुद्धा संविधानाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला व विद्यार्थिनिंना मार्गदर्शन केले. अशाप्रकारे विद्यार्थिनिंच्या आणि शिक्षकेत्तर वर्गाच्या बहुसंख्य उपस्थितीत ७५ वा भारतीय संविधान दिन’ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता वाणिज्य शाखेच्या रुकसार शेख आणि फरिन खान या विद्यार्थिनिंद्वारे दिलेल्या घोषवाक्यांनी झाली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News