ब्रम्हपुरी (चंद्रपुर) : ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांनी अवैध रेती वाहतुकीचे विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये नायब तहसीलदार आशीष तालेवार, आकाश करवते, मंडळ अधिकारी हीमांशु पाजनकर, इसड तलाठी राऊत तलाठी यांनी सहभाग घेतला. दिनांक ०५.१०.२०२४ रोजी रेत वाहतुक करणारे ०५ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. तसेच मागील १५ दिवसामध्ये १४ ट्रॅक्टर व १ हायवावर अवैध वाहतुकोची कार्यवाही केलेली आहे. जप्त केलेल्या ट्रॅक्टर व हायवावर दंडात्मक कारवाई केलेली असुन रुपये ४,४८,०००/- महसुल शासन जमा केलेला आहे. ईतर वाहनांवर दंडात्मक्त कारवाई सुरु असुन रुपये ८,००,०००/- महसुल शासन जमा होणार आहे.
तसेच रात्री भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध रेती चोरी वर आळा बसणार आहे. यावर्षी चेकपोस्ट व पथके तयार करुन अवैध रेती वाहतुकीवर अधिक तिव्र कारवाई करण्यात येणार आहे.