Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पालडोह शाळेत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी

जिवती (चंद्रपुर) : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पालडोह येथे महावाचन उत्सव अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य गोंडवाना कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.पांडुरंग सावंत होते. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हा तपासणी करिता आलेले देशमुख हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तालुक्यातून मुख्याध्यापक, शिक्षक तथा साधन व्यक्ती आदी हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज आवारी यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक व मुलांना गटशिक्षणाधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सांगितले की पुस्तकाचे जीवनात अन्य साधारण महत्व आहे. त्यांनतर प्राथमिक उपशिक्षणा अधिकारी विशाल देशमुख यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा स्तर समितीने शाळा पाहणी करत मूल्यांकन केले.

महावाचन उत्सव अंतर्गत प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. पांडुरंग सावंत यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. या वेळी शाळेच्या ग्रंथालयातील १००० ग्रंथांची शाळेतील मुलांनी मांडणी केली. आवारी यांनी त्याची उत्तम व्यवस्था केली. उपस्थित सर्व अधिकारी, शिक्षक व मुलांनी यावेळी वाचन करत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी पार पडली. महावाचन उत्सव अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेत यशस्वी पार पडला.

यावेळी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक व शाळेतील विद्यार्थी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड केले, तर या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक परतेकी यांनी केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News