घुग्घुस (चंद्रपुर) : शहरातील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले तसेच शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे गणेश कुटेमाटे, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, राकेश फुलझले, गणेश राजूरकर, हेमंत कुमार, संदीप तेलंग आदींची उपस्थिती होती.