देऊळगाव राजा : श्री संत गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था देऊळगाव राजा द्वारा संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी देऊळगाव राजा या महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. याच उपक्रमांपैकी दहीहंडी उत्सव महाविद्यालयात साजरा करण्यात आला परंतु यावेळी कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या अनुचित प्रकारांचा निषेध म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी अत्यंत शांततापूर्ण वातावरणात साजरी करण्याचे ठरवले, या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी कुठलाही प्रकारचा डीजे किंवा साऊंड सिस्टिम याचा वापर केला नाही. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बदलापूर व कोलकत्ता या ठिकाणी घडलेल्या अनुचित प्रकारांचा निषेध नोंदविला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रफुल ताठे, डॉ.गोपालकृष्ण सीताफळे, डॉ.पुरुषोत्तम लढा, प्रा.किशोर चराटे, डॉ.घुबे कार्यक्रम समन्वयक प्रा.तन्मय डोनगावकर, प्रा.अमोल गिरि, प्रा.रघुवंशी, प्रा.कोल्हे, प्रा.तायडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पूजन करून व प्रसाद अर्पण करून विद्यार्थ्यांना प्रसाद वितरण करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी समायोजित भाषणे केली त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची आठवण करून त्यांनी नारी शक्तीचा सन्मान ज्या प्रकारे केला होता तसाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा अनुचित प्रकारांना कशाप्रकारे आळा बसवता येईल याचा विचार करावा, अशा विकृत मनोवृत्तीचा निषेध याप्रसंगी करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.प्रफुल ताठे, डॉ.गोपाळ कृष्ण सिताफळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता बी फार्मचे विद्यार्थी व डी फार्मचे विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, यामध्ये शुभम राठोड, विष्णू पिंपळे, भागवत गायके, जय जाधव, अविनाश सानप, मयूर वखरे, ओम गीते, संकेत कुहिरे तसेच राम शेळके, शिवम बुधवत, शरद पवार, आरती डोईफोडे, यांनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे शांततापूर्वक वातावरणात दहीहंडी साजरी करण्यात आली.