ब्रम्हपुरी (चंद्रपुर) : ब्रम्हपुरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाचे सुशोभीकरण झालेले नाही. या चौकातून रेल्वे स्टेशनकडे, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे, धान्य बाजाराकडे व सराफा बाजाराकडे जाणारे रस्ते आहेत. चौक लहान पण वर्दळीचा आहे, न.प.ने अतुल गौरशेट्टीवार यांच्या हनुमान मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याची टाकी प्रवाशांच्या सोयीसाठी निर्माण केली, परंतु ती गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. ती फक्त तेथुन उचलली तर त्या जागेवर स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे निर्माण करता येईल. न.प. कार्यालयातर्फे निधी उपलब्ध करून दिल्यास चौकाचे सुशोभीकरण व पुतळा निर्माणाचे कार्य त्वरीत होईल. सदर बाबीचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उत्सव समिती व भारतीय विचार मंच, ब्रम्हपुरीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मुख्याधिकारी न.प. ब्रम्हपुरी यांना निवेदन देतांना वा.प्र. भुसारी, स.गो. शिनखेडे, श्रीकांत कावळे, अतुल गौरशेट्टीवार, प्र.ल.मत्ते, राजेश देऊरकर, संजय लांडे उपस्थित होते.




