Saturday, June 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आदिवासी उमेदवारांसाठी 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

चंद्रपूर : आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व वर्ग- 4 पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, येथे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षण 1 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील. या प्रशिक्षण कालावधीत खालील अटीची पुर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 26 जुलै 2024 पर्यंत खालील पत्त्यावर सादर करावेत. अर्जामध्ये स्वत:चे पूर्ण नांव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांचा नोदणी क्रमांक इत्यादी बाबींचा उल्लेख करावा व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

अर्ज करण्याकरीता EmploymentCard असणे आवयक आहे. या करीता दि. 29 जुलै 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. तरी दि. 26 जुलै 2024 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावे आणि दि.29 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखती करीता आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र.19, चंद्रपूर येथे मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिध्द कराण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी :
1). उमेदवार अनु.जमाती (ST) आदिवासी प्रवर्गातील असावा.
2). उमेदवाराचे किमान वय 18ते 38 चे दरम्यान असावे.
3). उमेदवार किमान एच. एच.एस.सी परीक्षा उर्त्तीण असावा.
4). उमेदवारांचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.

आवश्यक कागदपत्रे :
1).शाळा सोडल्याचा दाखला,
2).जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र
3). मार्कशिट्स एसएससी/एचएचएससी/पदवी
4).आधार कार्ड,
5). जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाचे नोंदणी कार्ड.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News