घुग्घुस (चंद्रपुर) : विर जवानांच्या पाचव्या पुण्य स्मरणार्थ आयोजक समस्त तेली समाज बहुउद्देशिय संस्था घुग्घुस च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर 14 फेब्रुवारी ला गांधी चौक घुग्घुस येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये गावाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान केले व विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले.
घुग्घूस चे राजकीस सर्व पक्षीय मांन्यवर विनोद चौधरी, राजू रेड्डी, रोशन पचारे, अंवर सय्यद, पवण आगदारी, लखन हीकरे, साजन गोहणें या सर्वांनी शिबीरामध्ये उपस्थीत राहून विर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले.
समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था चे सर्व कमेटी मेंबर सोनल भरडकर,
शैलेश बांगडे, दिनेश बोरपे, निलेश लांजेवार, अमोल श्रीरसागर, पंकज बोंबले ,अविनाश बुटले, विक्की जुनघरे, रूपेश डंभारे, रुकेश समर्थ, हर्षल बजाईत, आशिष खणके, शुभम बावनकुळे, राजू भलमे, विलास घिवे, विठोबा झाडे, प्रदीप भुते, विशाल बावनकुडे, लोकेश सहारे, प्रवीण पाटील, राकेश चलाख, गणेश झाडे, भूषण ढेंगळे, मयुर झाडे, आकाश ढेंगळे, शरद झाडे, दिनेश बांगडे, अमृतलाल चन्ने, या सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर यशस्वी रित्या पार पाडले.
तसेच समस्त तेली समाज बहुउद्देशिय संस्था तर्फे येत्या 5 वर्षा पासुन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते आहे आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करत असतात, घुग्घूस मध्ये असेच खूप काही सामाजिक कार्य ही संस्था घेत असतात.