घुग्घुस (चंद्रपूर) : भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुसचा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे पहिल्यांदा समता सैनिक दलाचे दोन दिवसीय शिबीर लावण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम जिल्हाध्यक्ष इंजि. नेताजी भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय शिबीर लावण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रदेशाध्यक्ष अशोक घोटेकर, जिल्हाध्यक्ष इंजि नेताजी भरणे शिबीराचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव शिबीर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेजर गुरुबालक मेश्राम, मेजर अशोक पेरकावार, मेजर प्रफुल्ल भगत, विशाल कवाडे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरात प्रमुख म्हणून भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर शहर सरचिटणीस किशोर तेलतुंबडे, भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस उपाध्यक्ष शरद पाईकराव, घुग्घुस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे केंद्रीय शिक्षिका माया सांड्रावार, समता सैनिक दल अध्यक्षा अश्विनी सातपुते, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर उपस्थित होते.
दोन दिवसीय शिबीरामध्ये दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी तथागत भगवान बुद्ध, प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करून शिबीराला सुरुवात करण्यात आली.
शिबीरामध्ये पंधरा वर्षावरील मुला मुलींनी महीलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शिबीराचा पहिल्या दिवशी जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे यांनी समाजाची बांधीलकी व बाबासाहेबांचा चळवळीला आणखी जास्त गती मिळावी घुग्घुस शहरामध्ये समता सैनिक दलाचे कार्य स्थगित होते. आता मात्र या शिबीराचा माध्यमातून ही चळवळ समोर जाईल,असे मनोगत व्यक्त केले.
स्मृतिशेष महेंद्र मानकर यांच्या तर्फे मुलांना नोट बुक देण्यात आले, तसेच पेन, पेन्सिल, इरेजर, हे भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस कडुन देण्यात आले. दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता पासुन तर पाच वाजेपर्यंत परेड व मार्गदर्शन करण्यात आले. ब्रेक मध्ये अल्पोपाहार सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे, विजय कवाडे यांच्या माध्यमातून देण्यात आला.
तीन ते चार वाजेपर्यंत सहभागी झालेल्या मुला, मुलींची लेखी परिक्षा सुध्दा घेण्यात आली.
जे मुल मुली या लेखा परिक्षेत पास होईल त्यांना समता सैनिक दलाचा कोड नंबर देऊन सैनिक बनवल्या जाईल असे मेजर गुरुबालक मेश्राम यांनी सांगितले. शिबीर मध्ये सहभाग झालेल्या मुला मुलींने अर्पित पाटील कोमल पोटफोडे, रिया कांबळे, सुषमा धोटे, व सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबीराचे संचालक यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिता देशकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन केंद्रीय शिक्षिका माया सांड्रावार यांनी करून शिबीराची सागता करण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.