नामांकित 17 कंपन्या उपस्थित राहणार
रिक्त 2 हजार 254 पदांसाठी मुलाखती
यवतमाळ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करीयर सेंटर मार्फत आमदार मदन येरावार यांच्या मतदारसंघात अमोलकचंद महाविद्यालय येथे दि.23 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यात वैभव एन्टरप्रायजेस नागपूर, फेरोइंडिया प्रा.लि. पूणे, मेगाफिड बायोटेक नागपूर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ, सारा स्पिंटेक्स धामणगाव रोड, यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रिज पुसद, इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर व इतर नामांकित अशा एकुण 17 कंपन्या उपस्थित राहणार आहे. या कंपन्या त्याच्याकडील रिक्त 2 हजार 254 पदांसाठी मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार आहे.
मेळाव्यामध्ये इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविकाधारक, पदविधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून संधीचा लाभ घेता येणार आहे. मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीद्वारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केलेले आहे.