चंद्रपुर : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. सदर मतदार यादी मध्ये आपले नाव तपासावे. दिनांक 04/11, 05/11, 25/11 व 26/11/2023 या तारखांना आपल्या संबंधित मतदान केंद्रावर यादी तपासणी करिता उपलब्ध राहील.
त्यावेळी सुद्धा आपले नाव तपासावे. दुरुस्ती, वगळणी, आधार जोडणी, नवीन नोंदणी यावेळी सदर ठिकाणी करता येईल. आपल्या सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. मुरुगानंथम एम IAS, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर.




