भाजपा हा ढीवर भोई समाजाला न्याय देणारा पक्ष म्हणून भाजपमध्ये प्रवेश : विशाल नागपुरे
घुग्घुस (चंद्रपुर) : ढीवर भोई समाजाचे नेते व काँग्रेसचे कट्टर नेते विशाल नागपुरे यांनी शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश केला.
विठ्ठल मंदिरात भोई-ढिवर समाज बांधवांतर्फे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती सोहळ्यात काँग्रेसचे विशाल नागपुरे यांनी देवराव भोंगळे निवडणुक प्रमुख राजुरा विधानसभा यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला.
याप्रसंगी देवराव भोंगळे निवडणुक प्रमुख राजुरा विधानसभा यांनी विशाल नागपुरे यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आणि भाजपा घुग्घुसच्या सोशल मीडिया प्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, सतीश बोन्डे, किशोर नागतुरे, भोई-ढिवर समाजाचे मंगेश पचारे, बबन पारशिवे, राजू कामतवार, दीपक कामतवार, गजानन कामतवार, अमोल नागपुरे, प्रवीण ठाकरे, रोशन पचारे, नंदू कामतवार, सुनील मांढरे, रितेश मांढरे व समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.