रत्नागिरी : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत मुख्य कार्यालयीन स्तरावर ई- निविदा प्रक्रिया सुरु असून. आपले अधिनस्त नौकामालकांना याबाबत तात्काळ अवगत करून गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी 20 सप्टेंबर पूर्वी निविदा 2 लिफाफा (2 बिड) पद्धतीने आवश्यक त्या कागदपत्रासह या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) अभयसिंह शिंदे इनामदार यांनी केले आहे.
सदरील नौका गस्तीकामी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित नौकामालक यांच्यामार्फत खालील अटी-शर्तींची पुर्तता होणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा)…