Saturday, May 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक व साठवणुकीवर मोठी कारवाई

अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून ३५ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे बुधवारी (ता.३१) छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करत ३५ लाख ७३ हजार ५४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

या कारवाईमध्ये ४ मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले १०५ सिलेंडर व रिकामे ६०२ सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

एका विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२०, २८५, २८६ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश २००० चे कलम ३ ते ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, असेही गिते यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News