Tuesday, April 28, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून दुर्गम भागात विद्युत सेवा सुरू

गडचिरोली : जिल्हा हा आदिवासी बहुल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांमध्ये आजही आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. अशा भागातील नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून सातत्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

याच उपक्रमांचा एक भाग म्हणून, आदिवासी नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून हेडरी उपविभागातील अतिदुर्गम मौजा तुमरकोठी येथे आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सहकार्याने यशस्वीपणे विद्युत सेवा सुरू करण्यात आली.

या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होणार असून, शिक्षण, आरोग्य व दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News