चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्घूस या नगरपालिकांमध्ये तसेच भिसी नगरपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे.
दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल. या अनुशंगाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विशेष निर्बंध लागू करण्याचा आदेश जारी केला आहे.
1 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत खालील निर्बंध लागू मतदान व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात :
अनधिकृत जमाव, सार्वजनिक सभा, वाहनांची वर्दळ बंदी
भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्य यांवर बंदी
मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहने वापरण्यास मनाई
मोबाईल, वायरलेस सेट इत्यादी मतदान केंद्रात नेण्यास बंदी (अधिकृत कर्मचारी वगळता)
धोक्यातील व्यक्तींना सुरक्षा दलासह 100 मीटर परिसरात येण्यास निर्बंध
मतमोजणी केंद्राबाहेरील 100 मीटर परिसरातील दुकाने, आस्थापना बंद
मतमोजणी केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी
ड्रोन उडविण्यास सक्त मनाई
प्रतिबंधातून सूट
“डोअर टू डोअर” प्रचार (5 पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई)
अँबुलन्स, दवाखान्याच्या गाड्या, दूधगाड्या, पाणी टँकर, पोलिस, वीज, निवडणूक कर्मचारी यांची वाहने
बसस्थानक, रेल्वे स्थानक किंवा हॉस्पिटलकडे जाणारी वाहने
दिव्यांग/आजारी मतदारांना त्यांच्या वैयक्तिक वाहनाने मतदानासाठी ये-जा
जिल्हादंडाधिकाऱ्यांचे हे आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सही व कोर्टाच्या शिक्क्यासह जारी करण्यात आले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेशाचे व्यापक प्रसारण करण्याचे निर्देश दिले आहेत.




