Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुस नगर परिषदेतील मतदान केंद्रांची पाहणी; सुरक्षा व सोयीसुविधांचा आढावा

घुग्घुस, चंद्रपुर : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गोयल यांनी घुग्घुस नगर परिषदेतील येथील evm मशीन टेवावची सुरक्षा कक्ष व जनता विद्यालय परिसरातील आठ मतदान केंद्रांची 26.11.2025 रोजी सविस्तर पाहणी केली. त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी चंद्रपूर विशालकुमार मेष्राम, निवडणूक निर्णय अधिकारी—नगर परिषद घुग्घुस, तसेच तहसीलदार चंद्रपूर विजय पवार उपस्थित होते.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस निलेश रांजनकर तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांनीही पाहणीदरम्यान माहिती दिली.

मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवकांच्या नेमणुकीसह मतदान केंद्रांवरील आवश्यक सर्व सोयीसुविधांची तपासणी करण्यात आली. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान प्रामाणिक आणि अचूक प्रशिक्षण देण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या.

सदर पाहणीमुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक किंवा व्यवस्थापकीय अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दृश्यमान झाले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News