Tuesday, April 28, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोली : पोलिसांची मोठी कारवाई, अंमली पदार्थ उत्पादनाची तयारी करणारा आरोपी ताब्यात

गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करीवर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली 14 नोव्हेंबर 2025 रोजी ही मोहीम राबवण्यात आली.

उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोलीस मदत केंद्र मालेवाडा यांनी मौजा हुर्यालदंड परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण ₹1,19,83,000/- किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत संशयिताकडून अंमली पदार्थ निर्मितीशी संबंधित साहित्य, उपकरणे तसेच तयार माल मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी हा जिल्ह्यात अवैध ड्रग साखळी उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गडचिरोली पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसणार असल्याचे अधिकारी म्हणाले. पुढील तपास उपविभाग कुरखेडा पोलिसांकडून सुरू आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News