Tuesday, June 9, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर महानगरपालिका कडून नवरात्रासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू

चंद्रपूर : आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सार्वजनिक मंडळांना मंडप व स्टेज उभारण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मंडळांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होऊन १ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर संबंधित विभागांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. यामध्ये शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच मंडळ पदाधिकाऱ्यांचे नियमावलीविषयी हमीपत्र आवश्यक आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की अंतिम परवानगी मिळाल्यानंतर ती मंडपाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. तसेच सार्वजनिक मंडळांना निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेचे संकेतस्थळ cmcchandrapur.com वरील Quick Link सदरात Pandal Permission 2025 पर्याय उपलब्ध असून अथवा थेट https://pandal.cmcchandrapur.com/ या लिंकवर जाऊन अर्ज सादर करता येणार आहे. संबंधित अर्जांची तपासणी पोलिस, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी करतील. त्यानंतर महापालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान केली जाणार आहे.

महापालिकेने सर्व मंडळांना शेवटच्या क्षणी अर्ज न करता तत्काळ परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.


spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News