नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती (2 ऑक्टोबर) या कालावधीत राज्यभर सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यात शासकीय सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आधारित ‘सेव्हन स्टार महसूली गाव अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन, आयएएस, यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभाग तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, गावपातळीवरील सर्वसामान्य नागरिकांची शासनाशी संबंधित कामे सुरळीत आणि वेळेत मार्गी लागली पाहिजेत. तसेच नागरिकांना उत्तम सेवेचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी काटेकोर नियोजनाने कार्यवाही करावी.
या अभियानांतर्गत शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.





