चंद्रपूर – चंद्रपूर पोलिसांनी रसायनवाडी परिसरात मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रॉन) सारख्या घातक अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने राबवलेल्या या कारवाईत एकूण ₹1,92,000/- किमतीचा मेफेड्रॉन पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी रसायनवाडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान दोघे आरोपी झुकून बसलेले असून, त्यांच्याजवळून एक दुचाकी, मोबाईल व अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
चंद्रपूर पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी अशा अंमली पदार्थांविरोधात सजग राहावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.





