Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरच्या माजरी पोलिस ठाण्यात 37 जप्त मोटारसायकलींचा लिलाव; इच्छुक खरेदीदारांकडून टेंडर मागवले

चंद्रपूर : माजरी पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून जप्त अवस्थेत असलेल्या जंगम मालमत्तेप्रकरणी कोणत्याही व्यक्तीने हक्क प्रस्थापित न केल्यामुळे संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात एकूण 37 मोटारसायकल्स (शासकीय अंदाजे किंमत 1,88,210 रुपये) यांचा समावेश असून, सदर वाहने ‘जशी आहे-तशी आहे’ या तत्त्वावर भंगार म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

लिलाव प्रक्रियेसाठी इच्छुक खरेदीदारांकडून सिलबंद टेंडर मागविण्यात आले असून, 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत वाहनांची तपासणी करता येईल. त्याच दिवशी अनामत रक्कम आणि नोंदणी प्रक्रिया पार पाडावी लागेल. लिलाव 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान होणार आहे.

लिलावाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –

  • वाहने जिथे आहेत तिथेच आणि ज्या स्थितीत आहेत, तशीच विक्री केली जाईल.
  • लिलावाच्या ठिकाणी संबंधित अटी व शर्ती सादर केल्या जातील.
  • खरेदीदाराने विक्री रकमेच्या 10% इतकी अनामत रक्कम भरावी लागेल.
  • यशस्वी बोली लावणाऱ्या खरेदीदाराने उर्वरित रक्कम तत्काळ भरावी लागेल; अन्यथा भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाईल.
  • फक्त भंगार व्यवसाय प्रमाणपत्र असलेले खरेदीदारच लिलावात भाग घेऊ शकतात.
  • अनामत रक्कम भरताना प्रमाणपत्र व आधारकार्डची झेरॉक्स प्रति सादर करावी लागेल.

लिलाव प्रक्रिया स्वीकारणे, रद्द करणे, पुढे ढकलणे अथवा कोणतेही कारण न देता निर्णय घेण्याचा सर्वाधिकार पोलीस स्टेशन माजरीचे ठाणेदार श्री. अमितकुमार पांडेय यांच्याकडे राहील, असे त्यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News