Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा आवाज; पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी

घुग्घुस (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील आमराई वॉर्ड क्रमांक 1 मधील महिलांनी त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात आवाज उठवला आहे. आज मंगळवारी, 23 जून रोजी या महिलांनी घुग्घुस पोलिस स्टेशनला भेट देत निवेदन सादर केले व तातडीने कारवाईची मागणी केली.

या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असून त्यामुळे परिसरातील वातावरण बिघडले आहे. महिलांना व मुलींना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा या ठिकाणी मद्यधुंद लोकांनी गैरवर्तन केले असून त्यामुळे महिला भयभीत आहेत.

या निवेदनासाठी रेणू सरोज, सुमन सरोज, निशा बी. मैठुला, दीप पौर्णिमा पुसाटे, शांताबाई शेरखाने, कविता कोकरे, शोभाबाई कोकरे, ममता कांबळे, द्रोपती राणा, सुनीता पुसाटे, महेंद्र बाग तसेच इतर अनेक महिला आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

महिलांनी पोलिसांकडे मागणी केली की, वॉर्डातील अवैध दारू विक्री तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि शांत जीवन मिळू शकेल.

घुग्घुस पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेतली असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News