Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त घुग्घुसमध्ये अभिवादन कार्यक्रम

घुग्घुस, चंद्रपूर (२३ जून २०२५): मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने आज राष्ट्रनायक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना किरण बोढे म्हणाल्या, “अमर हुतात्मा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश में दो प्रधान, दो विधान, दो निशान – नही चलेंगे, नही चलेंगे’ असा ठाम नारा देत जम्मू-काश्मीरमध्ये सत्याग्रह केला आणि देशाच्या एकतेसाठी आपले प्राण अर्पण केले. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना करत त्यांनी राष्ट्रीय एकतेचे बीज पेरले. जनसंघाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काश्मीरच्या विशेष दर्जाविरोधात आंदोलन उभारले. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी बलिदान दिले.”

या कार्यक्रमाला प्रयास सखी मंचच्या पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांमध्ये निशा उरकुडे, प्रीती गुल्हाने, प्रीती धोटे, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभीडकर, जाई आत्राम आणि हनुमान खडसे यांचा समावेश होता.

कार्यक्रमात राष्ट्रभक्तीचा संदेश देत, देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे स्मरण करण्यात आले आणि त्यांच्या विचारांना नव्याने उजाळा देण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News