Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नवप्रवेशित विद्यार्थिनींचे भव्य स्वागत सोहळा संपन्न – घुग्घुसात बैलगाडीतून आगमन, लेझीम व बँड पथकासह उत्सवाचा माहोल

(प्रणयकुमार बंडी)
घुग्घुस, चंद्रपुर | 23 जून 2025 : जिल्हा परिषद, संस्था व खासगी शाळांच्या घुग्घुस येथे आज पहिली ते आठवीच्या नवप्रवेशित विद्यार्थिनींसाठी भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमात विद्यार्थिनींचे आगमन पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून करण्यात आले. लेझीम पथक व बँडच्या निनादात पुष्पवर्षाव करत विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्षस्थानी उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक महाविद्यालयाचे प्राचार्य, नामवंत समाजसेवक, केंद्रप्रमुख यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी एकत्रितपणे मेहनत घेतली. संचालनही प्रभावीपणे पार पडले. हा आगळावेगळा उपक्रम पालकांमध्येही आनंद व कौतुकाचा विषय ठरला आहे.

विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाची सुंदर सुरुवात करत, घुग्घुस परिसरात आज उत्साह व आनंदाचं वातावरण निर्माण झालं.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News