Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

काँग्रेसतर्फे वृद्धाश्रमात कंबल व खाद्यपदार्थ वितरण कार्यक्रम

घुग्घुस (चंद्रपूर) : 9 जानेवारी 2025 रोजी घुग्घुस येथील नवी दिशा वृद्धाश्रम येथे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने कंबल व खाद्यपदार्थ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अनिल नरुले व राजुरेड्डी यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील वृद्ध महिला व पुरुषांना थंडीपासून बचावासाठी कंबलांचे वाटप करण्यात आले. तसेच वृद्धांसाठी तोस, बिस्कीट, चिवडा, चिप्स यांसारखे खाद्यपदार्थ वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाची खास वैशिष्ट्य म्हणजे वृद्धाश्रमातील माता-पित्यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमाला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, संध्या मंडल, मंगला बुरांडे, सरस्वती कोवे, अलीम शेख, अजय उपाध्ये, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, विशाल मादर, मोसीम शेख, सिनू गुडला, शहजाद शेख, शेखर तंगडपल्ली, आकाश चिलका, भास्कर सोनेकर, रोहित डाकूर, सुनील पाटील, दिपक पेंदोर, निखील पुनघंटी, दिपक कांबळे, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, कपिल गोगला, अनवर सिद्दीकी, अंकुश सपाटे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News