Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बनावट ओळखपत्रापासून सावध राहण्याचे आवाहन

नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे ओळखपत्र नि:शुल्कच

चंद्रपूर : महाराष्ट्र‌ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरीत करण्यात येते. पंरतु काही व्यक्ती दलालांमार्फत पैसे घेऊन बनावटी ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) दिले जात असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. करीता कोणत्याही बांधकाम कामगारांनी सदरील व्यक्ती /दलाला मार्फत बनावटी ओळखपत्र न घेता जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रातून आपले ओळखपत्र (स्माट कार्ड) घ्यावे.

सदर ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) हे निःशुल्क असल्याने कोणाही व्यक्तीस /एजेंट यांना पैसे देऊ नये. तसेच पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आवाहान सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News