Monday, July 13, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : आचारसंहिता उल्लंघनावर कारवाई, अनधिकृत बॅनर-पोस्टर्स हटवून दंडाचा इशारा

चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी निवडणूक आचारसंहिता जाहीर होताच प्रत्येक उमेदवार व राजकीय पक्षासाठी प्रचार साहित्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही उमेदवार व राजकीय पक्षांकडून रीतसर परवानगी न घेता बॅनर, पोस्टर्स, कटआऊट व होर्डिंग लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

या अनधिकृत प्रचार साहित्यावर कारवाई करत महानगरपालिका प्रशासनाने ३ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे १३० कटआऊट व बॅनर तसेच १५० झेंडे काढून टाकले आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचार कार्यालय, रॅली, मेळावे, मिरवणुका, रोड शो, बॅनर, कटआऊट, पोस्टर्स, जाहीर सभा, कॉर्नर सभा, प्रचार वाहने आदींसाठी परवानगी देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने एक खिडकी कक्ष सुरू केला आहे. या कक्षामार्फत ७ जानेवारीपर्यंत प्राप्त झालेल्या ११०६ अर्जांपैकी ८९२ अर्ज मंजूर, २१ अर्ज नामंजूर, तर १९३ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्ष परवानगीशिवाय बॅनर, पोस्टर्स किंवा होर्डिंग लावताना आढळल्यास संबंधित उमेदवाराकडून प्रत्येकी २ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

दरम्यान, निवडणूक आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००३०९७०४० किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ९०११०९५१६८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News