Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2025–26 : मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व उमेदवारांची तिसरी बैठक संपन्न

चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांची तिसरी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी निवडणूक प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक प्रचारासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

आयुक्तांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करताना प्रचाराच्या कायदेशीर मर्यादा, प्रचाराच्या वेळा, ध्वनिक्षेपकांचा वापर, भित्तीचित्रे, फलक, बॅनर व पोस्टर्स यासंबंधीचे नियम स्पष्ट केले. तसेच शासकीय मालमत्तेचा गैरवापर टाळणे, सामाजिक माध्यमांवर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे, धार्मिक, जातीय अथवा आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळणे याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी व उमेदवारांनी विविध प्रश्न व सूचना मांडल्या असून त्यांचे निरसन प्रशासनामार्फत करण्यात आले. आगामी निवडणूक पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच चंद्रपूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News