Monday, December 8, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

कूपर रुग्णालयात डॉ. संपदा मुंडे यांच्या निधनावर मूक मोर्चा — SIT चौकशी व ₹५ कोटी नुकसानभरपाईची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल (मंगलवार, 04.10.2025) वैद्यकीय समुदायाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चादरम्यान डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन शांततेत आपला संताप आणि दुःख व्यक्त केले.

मोर्चानंतर कूपर मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींनी वार्ताहरांशी संवाद साधत प्रमुख मागण्या मांडल्या. त्यांनी सांगितले की, डॉ. मुंडे यांच्या निधनाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) तात्काळ गठीत करावे. तसेच शासनाने या घटनेची अधिकृत दखल घेऊन त्यांच्या कुटुंबाला ₹५ कोटींची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा आणि मानसिक आरोग्य सहाय्य प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याचीही मागणी प्रतिनिधींनी केली.

वैद्यकीय समुदायाने सरकारकडे आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी डॉक्टरांच्या कार्यस्थळी सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण निर्माण करावे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News