Sunday, April 19, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीरहरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख 21 जुलै

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागांची संख्या 56 तर पंचायत समिती प्रभागांची एकूण संख्या 112 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

यासंदर्भातील अधिसूचना व अनुसूची परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) स्वरूपात तयार करून ती 14 जुलै रोजी शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयातील सूचना फलकांवर तसेच संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिक व इच्छुक व्यक्तींना या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी 21 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुकांनी आपले म्हणणे जिल्हाधिकारी अथवा संबंधित तहसीलदार कार्यालयात सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा आढावा :

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची एकूण लोकसंख्या 14 लाख 23 हजार 349 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 98 हजार 28 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3 लाख 18 हजार 373 इतकी आहे.

तालुकानिहाय सदस्य संख्येचे विवरण :

चिमूर : जि.प. सदस्य – 5 | पं.स. सदस्य – 10

नागभीड : जि.प. सदस्य – 4 | पं.स. सदस्य – 8

ब्रम्हपुरी : जि.प. सदस्य – 5 | पं.स. सदस्य – 10

सिंदेवाही : जि.प. सदस्य – 4 | पं.स. सदस्य – 8

भद्रावती : जि.प. सदस्य – 4 | पं.स. सदस्य – 8

वरोरा : जि.प. सदस्य – 5 | पं.स. सदस्य – 10

चंद्रपूर : जि.प. सदस्य – 5 | पं.स. सदस्य – 10

मूल : जि.प. सदस्य – 3 | पं.स. सदस्य – 6

सावली : जि.प. सदस्य – 4 | पं.स. सदस्य – 8

पोंभुर्णा : जि.प. सदस्य – 2 | पं.स. सदस्य – 4

गोंडपिपरी : जि.प. सदस्य – 3 | पं.स. सदस्य – 6

बल्लारपूर : जि.प. सदस्य – 2 | पं.स. सदस्य – 4

कोरपना : जि.प. सदस्य – 4 | पं.स. सदस्य – 8

जिवती : जि.प. सदस्य – 2 | पं.स. सदस्य – 4

राजूरा : जि.प. सदस्य – 4 | पं.स. सदस्य – 8

ही प्रभाग रचना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रशासनाचे आवाहन आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News