Saturday, April 25, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना मिळणार दिलासा; आमदार विकास ठाकरे यांचे मुख्यमंत्रीना साकडे

चंद्रपूर — चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील सुमारे १,५०० गरीब व गरजू कुटुंबांना महसूल खात्याच्या निर्णयामुळे मिळालेल्या नोटिसांमुळे घर गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर त्वरित कारवाई करीत नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठवून या नोटिसा तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

विकास ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, हे कुटुंबे गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून त्या जमिनीवर वास्तव्यास असून त्यांना घरकुल योजनेतून घर देण्यात आले होते. मात्र, महसूल विभागाने अचानकपणे नोटिसा पाठवून त्यांना घर खाली करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे, ७२ वर्षीय वृद्ध राधा राजम अनपर्थी यांना देखील नोटीस पाठवण्यात आली असून त्यांनी निवेदनाद्वारे दिलीप पिट्टलवार आणि राधा राजम अनपर्थी आपली व्यथा आमदारांकडे मांडली होती. त्याच पार्श्वभूमीवर आमदार ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

त्यांनी प्रशासनाला पुढील निर्देश दिले आहेत:

०९.०९.२०१९ पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांना दिलेल्या सर्व नोटिसा तत्काळ मागे घेण्यात याव्यात. यासंदर्भातील शासन निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी. लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे (Ownership Rights) वितरित करण्यात यावेत. गरीब नागरिकांना न्याय मिळावा यासाठी महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

या पत्राच्या प्रती संबंधित अधिकारी, राधा राजम अनपर्थी यांचे निवेदन आणि इतर नागरिकांना बजावलेल्या नोटिसांसोबत पाठवण्यात आल्या आहेत.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News