Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

दुर्गापूर पोलीस स्टेशन येथील जप्त वाहनांचा लिलाव लवकरच होणार : मालकांनी मालकी हक्क सिद्ध करण्याचे आवाहन

चंद्रपूर – दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने उघड्यावर पडून असून, त्यावर हवामानाचा वाईट परिणाम होत आहे. सदर वाहने दीर्घकाळ तशीच पडून असल्यामुळे त्यांची अवस्था खराब होत चालली आहे. यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार या वाहनांचा लिलाव करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने कळवले आहे की, ज्या वाहनधारकांनी आपापली वाहने परत मिळवायची आहेत, त्यांनी लवकरात लवकर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह मालकी हक्क सिद्ध करावा. जर सहा महिन्यांच्या आत कोणीही मालकी हक्क सिद्ध केला नाही, तर त्या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

जप्त वाहनांची यादी पुढीलप्रमाणे :

हिरो पॅशन प्रो (काळा रंग) – वाहन क्र. MH-40 AH 2695, इंजिन क्र. HA10ENEHA26880, चेचिस क्र. MBLHA10AGAHA06099., यामाहा RAYZR मोपेड (पांढऱ्या व ग्रे रंगात, हिरव्या अक्षरात नाव) – विना नंबर, इंजिन क्र. E3N8E0432822, चेचिस क्र. ME15E77HAG0043738., हिरो होंडा स्प्लेंडर (काळा रंग) – वाहन क्र. MH-34 S-1156, इंजिन क्र. 014L15E18505, चेचिस क्र. 04L16F18757., बजाज ऑटो रिक्षा – वाहन क्र. MH-34 D-2195., होंडा सिटी कार – वाहन क्र. MH-31 BB-1700., हिरो एक्स्ट्रीम मोटरसायकल – वाहन क्र. MH-34 AR-9035, इंजिन क्र. KC12EEDGL08447, चेचिस क्र. MBLKC12EHDGL06319., मोपेड गाडी – वाहन क्र. MH-34 AZ-8625, इंजिन क्र. JF33AAGGC34218, चेचिस क्र. MBLJF16ESGGC26025., टीव्हीएस स्कुटी पेप मोपेड – वाहन क्र. MH-33 E-4170, इंजिन क्र. OGE72387505.

पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या सूचनेची गंभीर दखल घ्यावी व मालकी हक्क असल्यास कागदपत्रांसह तात्काळ संपर्क साधावा. अन्यथा, नियमानुसार लिलावाची प्रक्रिया पार पडेल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News